बोरपाडा गावाची माहिती

बोरपाडा हे गांव रायंगण नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक छोटेसे गांव आहे. महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यातील एक प्रगतशील व कृषिप्रधान असे गांव आहे. नवापुर पासुन पूर्वेला १३ किमी. अंतरावर आहे. पुर्वेला ५ किमी. अंतरावर दापुर गांव आहे. त्याचबरोबर जवळच गिधकडा धबधबा आहे. पश्चिमेला २ किमी. अंतरावर करंजी बु. गाव आहे. दक्षिणेला ७ किमी. अंतरावर कामोद गाव आहे. तसेच उत्तरेला १ किमी. अंतरावर पाटी गाव आहे. जिल्ह्याच्या ठिकाणापासून ५३ किमी. अंतरावर आहे. ग्रामपंचायतीची स्थापना दिनांक – ०१/०५/१९५९ मध्ये झालेली आहे. सन – २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या १९७३ असुन पुरुष -९७५ व स्त्री – ९९८ इतकी लोकसंख्या आहे. गावात एकुण ५६५ कुटुंबे आहेत. गावामध्ये एकूण ३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. इ. १ ली ते इ. ४ वी पर्यंत असुन त्या शाळा डिजिटल करण्यात आलेल्या आहे. तसेच गावात ५ अंगणवाडी केंद्र असुन चार अंगणवाडी डिजिटल व १ अंगणवाडी CCTV च्या निगराणीत आहेत.
गावाचा मुख्य व्यवसाय शेती असुन शेतात ऊस ,मका ,सोयाबीन ,भात ,भुईमुग,भाजीपाला इ.पिके घेतली जातात. तसेच शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्धव्यवसाय केला जातो. तसेच गावात रायंगण नदीवर धरण (प्रकल्प) बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे गावात पाण्याची कमतरता भासत नाही.